MPSC combine चा फॉर्म भरताना या अडचणी येत आहेत, असा करा अर्ज
गट-क लिपिक टंकलेखक ला अतिरिक्त आरक्षण मुंबईतील विभागांना लागू नाही. त्या मुळे मुंबईतील कार्यालये निवडून अर्ज करू नका, असा Error येईल. या साठी पहिले तुम्ही तुमचे इतर आरक्षण बघा आणि त्याचा फायदा बघा की, किती जागा आहेत? कुठे आहेत, जागा तरी आहेत का? मुंबईत जेवढ्या जागा आहेत त्याच्या तुलनेत आहेत का? आपण पात्र आहोत का? असा सर्व विचार करून तुम्ही अतिरिक्त आरक्षण न घेता सर्वांसाठी अर्ज करू शकता.. अर्ज करतांना फक्त तुम्हाला अर्धा एक तास जाहिरातीतील जागांचे विश्लेषण करावे लागेल आणि तुमच्या फायद्यात मुंबई सोडून इतरच चांगले असेल तर ते अर्ज करा. मुंबईतील पाहिजे असेल तर अतिरिक्त आरक्षण सोडून अर्ज करा
शेवटच्या वर्षाला नसतांना Appearing टाकून परीक्षा देणे आणि Typing नसतांना अर्ज करून परीक्षा देणे यात काही फरक नाही
पण, दोन्ही यात उमेदवार नापास होऊ शकतो. विशेषतः Typing मध्ये नापास होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्ही पूर्व पास होऊन पण मुख्य ला अर्ज करता नाही येत. सोबत, Typing नसेल तर Documents Upload करून नाही घेत, देण्यासाठी काही नसते. पण, Graduation साठी घेतात त्यासाठी तुम्ही अंतिम वर्षाला असाल तर पहिल्या वर्षांपासून जेवढी असतील तेवढे Marksheets Upload करावी लागतात आणि चुकीचा अर्ज करत असाल तर अर्ज करण्यापासून दूर रहा.. कारण अर्ज केला तरी तुम्हाला काही तरी Upload करावे लागेल आणि नाही केले तर अर्ज होणार नाही आणि केले तर ते अपूर्ण असेल..एक प्रकारे खोटा दावा होईल त्यामुळे पात्र असाल तरच अर्ज करा..जुने दिवस गेले
