Mpsc संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आयोगाकडे केली मागणी
![]() |
The Competitive Examination Coordinating Committee made a demand to the Commission regarding Mpsc |
Mpsc : स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे आज मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री व श्रीकांत शिंदे खासदार यांची भेट घेण्यात आली. नुकतीच प्रसिद्ध झालेली MPSC गट-ब आणि गट-क संयुक्त जाहिरातीत लिपिक-टंकलेखक पदाचा पूर्व परीक्षेनंतर प्राधिकरणनिहाय कट ऑफ लावण्याच्या निर्णयामुळे रीपीटेड टॉपर विद्यार्थी अनेक प्राधिकरणात मुख्य साठी गणले जातील. यामुळे मुख्य परीक्षेचा कट ऑफ कमालीचा वाढून हजारो उमेदवारांच्या मुख्य परिक्षा देण्याच्या संधी नाहकपणे हिरावल्या जातील. लिपिक पदाच्या ७,०३४ जागा असल्याने मुख्य परीक्षेस उदा. १२ पट उमेदवारांना, ७०३४ × १२ = ८४,४०८ उमेदवारांना संधी प्राप्त व्हावी व पूर्व परीक्षेनंतर लिपिक पदासाठी राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावावा ही मुख्य मागणी आहे. राज्यसेवाप्रमाणे सर्व विभागांचे विकल्प घेण्यात येवून फक्त अंतिम निवड यादी लावतानाच त्याचा विचार व्हावा. असे निवेदन आज मुख्यमंत्री तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले असून सामान्य प्रशासन विभाग तसेच आयोगासोबत तत्काळ चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी आम्ही यावेळी केली आहे
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य