Mpsc कम्बाईन चा फॉर्म भरताना ही काळजी घ्या, नाहीतर याचे परिणाम भोगावे लागतील

 


Combine २०२३ : सर्व विद्यार्थी तसेच ग्रुप चालकांना विनंती, उद्यापासून संयुक्त पूर्व परीक्षेच्या अर्जास सुरुवात होणार असून, सदर संदेश सगळीकडे फॉरवर्ड करून सहकार्य करा. 


ज्या उमेदवारांची टायपिंग एक्साम  येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च  2023 मध्ये होणार आहे ते उमेदवार आणि ज्यांच्यापाशी Typing Certificate आहे उमेदवार त्यांनीच लिपिक-टंकलेखक व कर सहायक  पूर्व परीक्षेचा फॉर्म भरा.


 कारण जर आता न Combine व्याने टायपिंग साठी प्रवेश घेतला तर त्याची परीक्षा होण्यासाठी इथून पुढे 6 महिने लागतात, तसेच तिथून पुढील 45 दिवसात निकाल लागत असतो. 


म्हणजे Mains exam वेळी टायपिंग certificate नसेलच . 




 तसेच गट-क लिपिक पदांच्या मागील २-३ परीक्षांचा आढावा घेतल्यास, मोठ्या प्रमाणात असे विद्यार्थी आढळून आले आहेत, ज्यांच्याकडे टायपिंग प्रमाणपत्र नसतानाही अर्ज करताना लिपिक पदावर Tick केले गेले. पूर्व परीक्षेचा कट ऑफ या अपात्र विद्यार्थ्यांमुळे काही प्रमाणात वाढला, या विद्यार्थांची लिपिक पदी निवड झालीच नाही परंतु यांच्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी कट ऑफच्या बाहेर फेकले गेले. कृपया Typing नसेल तर उगाच लिपिक पद select करून Cut-off वाढवू नका. आपण अधिकारी होणार आहोत, थोडे सुज्ञ बना, एखाद्या पात्र गरीब विद्यार्थ्याचे आयुष्य कदाचित या परीक्षांवर अवलंबून असते याची जाण ठेवत पात्र असाल तरच लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज करा.


कोणाला हक्काच्या जागे पासून दूर करू नका...


ही नम्र विनंती 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url