राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! MPSC चे नवीन नियम २०२५ पासून लागू होणार
Good news for the students of the state! New rules of MPSC will come into effect from 2025 onwards |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट. MPSC परीक्षांबाबतचे नवे नियम 2025 पासून लागू होतील. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले.
UPSC प्रमाणे आता MPSC मध्ये देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू होणार आहे. मात्र, हा पॅटर्न 2023 पासून नव्हे तर 2025 पासून लागू करण्यात यावा, असा या विद्यार्थ्यांचा विरोध आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान, सरकारने यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची माहिती दिली होती. त्यानंतर इतर मंत्र्यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देत 2025 पासून हे नियम लागू करण्याची विनंती केली.
त्यानंतर या निर्णयाला तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राज्य सरकार एमपीएससीला विनंती करेल. तसेच अधिकृत घोषणा यासंदर्भात लवकरच होण्याची शक्यता आहे.