बुलढाणा १२ वीच्या पेपरफुटी प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय
सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दिनांक ०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या दोन पानांच्या प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे. या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आले नसले, तरी त्यामुळे बारावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेतली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिले आहे.
या प्रश्नपत्रिकेची दोन पाने सकाळी 10.30 नंतर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. बोर्डाच्या सूचनेनुसार परीक्षार्थींनी सकाळच्या सत्रात 10.30 वाजेपर्यंत आणि दुपारी 2.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळेच गणिताचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही. अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात फिर्याद क्र. कलम 0037 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, असे श्रीमती ओक म्हणाल्या.