Mpsc चे विद्यार्थी दोन दिवसापासून आंदोलन करत आहे कोणीही दखल घेत नाही
माय बाप सरकार रडवल तुम्ही
आजवर आम्हा वाटत होतं कि सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करत असते.पण हे आज आपण स्पष्ट केले आहेच,जे विद्यार्थी आपल्या योग्य मागणीसाठी आंदोलन करीत आहेत आपण त्याची साधी दखलही घेऊ नये.गोरं गरीबांची मुले अधिकारी होऊ नये यासाठीच हा राज्यसेवा मुख्य वर्णनात्मक पॅटर्न आपण जबरदस्तीने विद्यार्थ्यांच्या माथी मारत आहात.आमचा या पॅटर्न ला विरोध नाही फक्त आम्हाला त्या पॅटर्नशी जूळवून घ्यायला किमान 2025पर्यंत तरी वेळ मिळावा ही आमची रास्त मागणी तरी या रास्त मागणी साठी करीत असलेल्या आंदोलनाची साधी दखलही न घ्यावी.आपणास विद्यार्थी धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.युवा वर्ग आणि तोही Mpsc करणारा याला आपण अजून ही समजून घेतला नाही.ही तमाम महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.जे विद्यार्थी आपले भविष्य सुधारावे यासाठी जीव तोडून Mpsc चा अभ्यास करतात त्यांच्या वर आपण आंदोलन करायची वेळ आणत आहात याच्याहून या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी अजून दुर्दैवी गोष्ट कोणतीच नसावी.आम्ही लढू आमच्या हक्कासाठी न्यायासाठी...🔥🔥🔥🔥