Mpsc आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आयोजकांकडून लवकरच भूमिका कळेल
उपरोक्त विषयान्वये, आपले पत्र प्राप्त झाले असून राज्यसेवा लेखी पैटर्न २०२५ पासून लागू व्हावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन होत आहेत. त्या अनुषंगाने ३१ जानेवारी रोजी सरकारकडून मागणी मान्य करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आले आहे. परंतु काही दिवस लोटूनही अंमलबजावणी केली नाही व त्यासंबंधी टाळाटाळ करण्यात येत आहे. तरी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणी साठी आपण सरकार विरोधात दिनांक १७/०२/२०२३ रोजी अलका टॉकीज चौक, सदाशिव पेठ, पुणे येथे आंदोलन करणार असल्याबाबत समजते.
परंतु २१५, कसबा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली असून पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे. सर्व उमेदवारांच्या प्रचार फेन्या / सभा चालु आहेत. आपले वरील विषयान्वयेचे मागील आंदोलन दिनांक १३ / ०१ / २०२३ रोजीचे सकाळी ०९.०० ते दिनांक १४/०१/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वाजेपर्यंत झाले होते. आपले नेतृत्वातील चाललेल्या विदयार्थ्याच्या सदर आंदोलनाचा अनुभव पहाता आणि आदर्श आचारसंहितेचा विचार करता पोलीसांना २१५ कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे दैनंदिन कर्तव्य व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे इत्यादी महत्वाचे कर्तव्य असल्याने आपणास दिनांक १७/०२/२०२३ रोजी आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.